अभिनेता नागा चैतन्य पुन्हा प्रेमात; लवकरच करणार लग्न

अभिनेता नागा चैतन्य पुन्हा प्रेमात; लवकरच करणार लग्न

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा सध्या त्याच्या चित्रपटासाठी नाही तर त्याच्या अफेअरमुळे चांगलाच चर्चेत आहे. नागा चैतन्य याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. सोशल मीडियावर देखील त्याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. तो कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. त्याचा भाऊ हा उद्योजक तर वडील नागार्जुन हे प्रसिद्ध अभिनेते आहेत.
अभिनेता नागा चैतन्य सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. त्याने आपली पत्नी आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतला. त्याला काही काळ उलटत नाही तोच त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तो एका अभिनेत्रीलाच डेट करतो आहे. नागा चैतन्य हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करतो ते आता एकमेकांसोबत खूप जास्त वेळ घालवत असुन आपल्या नात्याबद्दल खुश आहेत, असे म्हटले जात आहे. शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या रिलेशनवर अद्याप कोणतयाही प्रकारचे भाष्य केले नाही.
ते दोघे लवकरच लग्न करणार असून लग्न झाल्यावरच आपले नाते जाहिर करणार असल्याचेही सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच हे एकत्र फिरण्यासाठी देखील गेले होते. अशीही चर्चा आहे. त्यामुळे सॅमन्था नंतर या दोघांची लाव लाईफ काळ टिकते हे पाहावे लागेल.