DRDO कडून स्मार्ट मिसाइलच यशस्वी परीक्षण

DRDO कडून स्मार्ट मिसाइलच यशस्वी परीक्षण
SMART मिसाइल news – भारतीय संऱक्षण आणि विकास संस्थेने 1 मे रोजी कलाम बेटावर स्मार्ट मिसाइलच यशस्वी परीक्षण केले. ही एक लांब पल्ल्याची सुपरसॉनिक एंटी-सबमरीन मिसाइल आहे. या मिसाइलच्या नाकामध्ये 50 किलोपर्यंत स्फोटक फिट केली जाऊ शकतात. या मिसाइलच नाव सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडो आहे. हे एक टॉरपीडो आहे. याला मिसाइलचा स्पीड आणि ताकद देण्यात आली आहे. या टॉरपीडोच्या सहाय्याने समुद्रात शत्रुच्या जहाजाला, पाणबुडीला नाश्ता करता येऊ शकते. अशी हि एक स्मार्ट मिसाइल DRDO कडून बनवण्यात आली आहे. जिचा भारताला चांगलाच फायदा होऊ शकतो.
या मिसाइलमध्ये दोन स्टेज सॉलिड रॉकेट इंजिन आहे. इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी ही टॉरपीडो आहे. सॉलिड फ्यूल आणि सिल्वरजिंक बॅटरीने पुढे जाण्यासाठी ताकद मिळते. SMART मिसाइलची रेंज 643+20 km आहे. म्हणजे मिसाइल 643 किलोमीटरपर्यंत सुपरसॉनिक स्पीडने जाईल.
दरम्यान टॉरपीडो या स्पीडचा फायदा उचलून 20 किलोमीटर पाण्याच्या आतापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे शत्रूला कळणारच नाही की, मिसाइलने हल्ला होतोय की, टॉरपीडोने. 1234 km/hr वेगाने हे अस्त्र शत्रुच्या दिशेने जाईल. या मिसाईलच्या माध्यमातून जल, भूमी, पाहणी वायू अशा तिन्ही ठिकाणावरून शत्रूला पराजय करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. हि एक चांगली उपलब्धी म्हणावी लागेल.