देशातील आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडण्याचे काम मोदींनी केले : ना. विखे

0
Dr Radhakrushna Vikhe Patil

देशातील आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडण्याचे काम मोदींनी केले : ना. विखे

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोविड संकट ही संधी मानून देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. प्रत्‍येक सामान्‍य माणसाला घराजवळच आरोग्‍य सुविधांचा लाभ मिळण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेला प्रत्‍येक निर्णय आज कृतीत उतरल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

इंडियन मेडीकल असोशिएशन, निमा यांच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सर्व डॉक्‍टर्स, फार्मासिस्‍ट, पॅथोलॉजिस्‍ट यांच्‍याशी संवाद साधला. खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप, भाजपाचे अध्‍यक्ष अभय अगरकर, विनायक देशमुख, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलींद पोळ, सेक्रेटरी सचिन पंडुळे, डॉ.रविंद्र साताळकर, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.प्रकाश कांकरीया, केमीस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष दत्‍ता काडळकर, लॅब असोसिएशनचे अध्‍यक्ष निनाद आकोलकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्‍य सरकारने आरोग्‍य विषयक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. आयुष्‍यमान भारत योजनेचा मोठा दिलासा मिळाला असून, राज्‍य सरकारनेही महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना आता नव्‍या बदलाच्‍या स्‍वरुपात सुरु केली आहे. यामध्‍ये येणा-या त्रृटी दुर केल्‍या जातील. कोव्‍हीड नंतर आरोग्‍य सुविधा अधिक परिपुर्ण कशा होतील यासाठीच मोठी गुंतवणूक आता करण्‍यात येत असून, देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतर पहिल्‍यांदाच आरोग्‍य सेवेला विकासाच्‍या प्रक्रीयेशीजोडण्‍याचे महत्‍वपूर्ण काम मागील दहा वर्षात झाले असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेमध्‍ये सुध्‍दा आरोग्‍य सुविधेला प्राधान्‍यक्रम आहेच, या बरोबरीनेच जिल्‍ह्यामध्‍ये रोजगार निर्मितीही औद्योगिक आणि पर्यटन विकासातून होवू शकते यासाठी आता जिल्‍ह्याचा विकास आराखडाही तयार करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जिल्‍ह्याला साहित्‍य, कला, संस्‍कृतीचा मोठा वारसा आहे, त्‍या दृष्‍टीन नॅशनल स्‍कुल ऑफ ड्रामाच्‍या धर्तीवर एखादी शाखा सुरु करतानाच शहरातील वाडीया पार्कला अंतरराष्‍ट्रीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न होईल अशी ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.