यापुढील निवडणूक एकत्रच लढणार : मंत्री विखे – आ. शिंदे यांच्यातील वाद संपुष्टात

यापुढील निवडणूक एकत्रच लढणार : मंत्री विखे - आ. शिंदे यांच्यातील वाद संपुष्टात
जामखेड (प्रतिनिधी) – “माझ्यात व आ. राम शिंदे यांच्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवूनच एक विचाराने लढविणार आहोत, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आ. प्रा. राम शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शहरातील जामवाडी, तपनेश्वर, मुख्य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्ती, आरोळे वस्ती आणि चुंभळी येथे नागरीकांच्या भेटी घेवून मानती विखे यांनी मतदारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहीती देवून महायुतीच्या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आ.राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, विनायकराव देशमुख आदी उपस्थित होते.
विखे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत : आ. शिंदे
मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्याला आता महायुतीच्याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे . असे आ. राम शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे जिल्यात रूढ असलेले विखे – शिंदे वादाचा हा विषय शिंदे यांनी संपविला.