मतांसाठी फतवे काढणारांना जनता थारा देणार नाही : डॉ. शर्मा

मतांसाठी फतवे काढणारांना जनता ठार देणार नाही : डॉ. शर्मा
नगर (प्रतिनिधी) – मतांच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढून कुणी राजकारण करणार असेल तर त्याला जनता थारा देणार नाही. जनता ‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून देऊन मतांची क्रांती करून राष्ट्रवादाला पाठबळ देईल असा विश्वास उत्तरप्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे प्रभारी खासदार डॉ. दिनेशकुमार शर्मा यांनी व्यक्त केला.
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवस दौरा खासदार दिनेश शर्मा यांनी केला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधून निवडणुकीतील बारकावे त्यांनी जाणून घेतले. नगरमध्येही युवा वॉरियर्स या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, विनायकराव देशमुख आदी उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना डॉ.शर्मा म्हणाले की, राज्यात महायुतीला मोठे यश मिळणार असून २०१९ च्या विधानसभेत राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवेल. विरोधकांमध्ये आता कोणताही आत्मविश्वास राहिला नाही. विरोधी आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे. पराभव समोर दिसू लागल्याने फतवे काढून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याची जोरदार टिका शर्मा यांनी केली.
तसेच डरो मत असे बोल होते. प्रियंका गांधी ‘मै लढती हू लढती रहुंगी’ असे देशभर सांगत होत्या मात्र निवडणुकीत त्यांची भूमिका ही केवळ राजकीय पर्यटनाची असून निवडणुका झाल्या की त्या लगेच रोम आणि इटलीत दिसतील अशी खोचक टीका शर्मा यांनी केली.