गुगल पे, फोन पे याना भीम ॲप देणार टक्कर!

0
Upi

गुगल पे, फोन पे याना भीम ॲप देणार टक्कर!

BHIM UPI NEWS – सरकारी पेमेंट ॲप (BHIM) येत्या काही दिवसात भारतीय बाजारात धमाका करणार असे दिसतेय, भीम अँप 2016 साली बाजारात लॉन्च करण्यात आले होते मात्र, भीमला जोरदार कामगिरी अद्यापपर्यंत करता आली नाही. गुगल पे, फोन पे आणि आता संकटात सापडलेल्या पेटीएमसह इतर पेमेंट ॲपने आपला मोठा पसारा वाढवला आहे. मात्र आता भीम पुन्हा बाजारात मोठा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाले आहे. बाजारातील दिग्गज ॲपला भीम ONDC च्या मदतीने थेट फाईट देणार आहे. तशी पाऊले आत उचलली जात आहेत.

भीम मध्ये Open Network for Digital Commerce (ONDC) च्या मदतीने मोठ्याप्रमाणावर बदल करण्यात येणार आहे. गुगल पे, फोन पेची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भीम युपीआय ॲपमध्ये आवश्यक ते बदल आणि रणनीती ठरविण्यात येत आहे. या ॲपच्या मदतीने खाद्यान्न आणि शीतपेय, किराणा, फॅशन आणि कपडे खरेदीवर ऑफर्स देण्यात येणार आहेत. ओएनडीसीचे माजी उपाध्यक्ष राहुल हांडा यांना आता भीम ॲपचे मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान 5-7 दशलक्ष व्यापार असलेल्या पेटीएम आता बाजारातून कमी होताना दिसत आहे, कारण त्यावर अलीकडेच कारवाई करण्यात अली होती, याचा मोठा वाटा भीमला मिळू शकतो. त्यासाठी धोरण आखण्यात येत आहे. असे झाले तर भीम चांगले काम देशात करील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.