सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी बाजारभाव!

सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी बाजारभाव!
राज्यातील सोयावींचे बाजारभाव सध्या चांगलेच ढासळले आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले दिसत आहेत. याला कारणीभूत ठरलंय ते सोयाबीनचे घसरलेले बाजारभाव. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. हा दर 4000 ते ४५०० रुपये प्रती क्विंटल इतका आहे. लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रसरकारचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारकडून 2023-24 या वर्षांत सोयाबीनला 4 हजार 600 रुपये प्रती क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला होता. मात्र मागील एप्रिल महिन्यात सोयाबीनला राज्यात प्रती क्विंटल जो दर मिळाला तो हमीभावापेक्षाही कमी आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत आहे, तसेच कापसाचे बाजारभाव देखील पडलेच पाहायला मिळत आहेत.
केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनला प्रती क्विंटल ४३८७ रुपये, दुसऱ्या आठवड्यात ४४७२ रुपये, तिसऱ्या आठवड्यात ४३८५ रुपये, तर चौथ्या आठवड्यात प्रती क्विंटल 4117 रुपये इतका बाजारभाव मिळाला होता. सध्या देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मागील वर्षी सोयबिनला जो भाव होता त्यापेक्षा आताचा प्रती क्विंटल दर हा जवळपास ४०० ते ४५० रुपयांनी कमी आहे.
एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे, त्यामध्ये देशातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेते गुंतलेले असताना शेतकऱ्यांना मात्र कोणी वली आहे कि, नाही अशी संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.