कॉलर आयडीसाठी TRAI चे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश

कॉलर आयडीसाठी TRAI चे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश
CALLER ID – देशातील फोन वापरकरणार्यांना अनोळखी कॉलच्या डोकेदुखीपासून आता सुटका मिळणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना कॉलरचे नाव दाखवायचे निर्देश दिले आहेत. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही सुविधा सुरु झाल्यावर कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने कॉल केला तर त्याचे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर याप्य्ध्ये दिसणार आहे. त्यामुळे थर्ड पार्टी आप्लिकेशनचा वापर बहुतांशी बंद होईल.
जर आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणताही क्रमांक सेव्ह नसेल. आणि अनोळखी क्रमांकावरुन कॉल येत असेल, तर पहिला प्रश्न पडतो की हा फोन करतो तरी कोण? जर तुमच्या ट्रूकॉलर ॲप असेल तर समस्या नसते. पण अनेक जण सुरक्षेच्या कारणावरुन हे ॲप वापरत नाहीत. अशावेळी अनोळखी क्रमांक डोकेदुखी ठरतो. त्यामुळे आता कोणी कॉल केला हे कळणार आहे.
अनोळखी कॉलची माहिती घेण्यासाठी सध्या अनेक स्मार्टफोन युझर्स त्यांच्या मोबाईलमध्ये थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करतात. त्यामध्ये अनेक युझर्स ट्रूकॉलरचा अधिक वापर करतात. थर्ड पार्टी ॲप्स त्यांची सेवा देण्यासाठी युझर्सकडून काही परवानग्या घेतात. त्यामध्ये कॉन्टॅक्ट, फोन गॅलरी, स्पीकर, कॅमेरा आणि कॉल हिस्ट्रीची माहिती घेण्यात येते. तुम्ही परवानगी न दिल्यास हे ॲप काम करत नाहीत. पण परवानगी दिल्यावर तुमचा डेटा किती सुरक्षित राहतो, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे थर्ड पार्टी अँप्लिकेशनचा वापर करणे बंद होईल, आणि सुरक्षिततेच्या वाढ होईल.
दरम्यान याची ट्रायल हि सध्या हरियाणा येथे सुरु आहे, यानंतर संपूर्ण देशात हे लागू करण्यात येणार आहे.