श्रीगोंदा : खुनाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

श्रीगोंदा : खुनाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – येथील एसटी बस स्टॅन्ड व बाजारतळ परिसरात काम करणारा नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या याची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान २०२१ मध्ये नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या, सुनील ससाणे आणि बापू विष्णू ओहोळ यांच्यात दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून शाब्दिक वाद होऊन त्याचे मारहाणीत रूपांतर झाले. दरम्यान बापू विष्णू ओहोळ यांचा मृत्यू झाला, याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नामदेव उर्फ लंगड्या भोसले याच्याविरुद्ध सुनील भागचंद घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा अधिक तपास दिलीप तेजनकर यांनी केला.
याबाबत श्रीगोंदा न्यायालयामध्ये खटला चालला यामध्ये साक्षीपुरावे तपासून न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपी निर्दोष मुक्त केले. आरोपीच्यावतीने वकील दत्तात्रय झराड यांनी काम पहिले, त्यांना याकामी वकील सचिन झराड, स्वप्नील होले, राजन नहार, चैताली साळूंके, प्रेरणा धेंडे यांनी सहकार्य केले.