एसटी बँकेचे सदावर्तेचे संचालकपद रद्द !

एसटी बँकेचे सदावर्तेचे संचालकपद रद्द !
ST BANK NEWS – राज्यातील एसटी बँकेचे संचालक गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे संचालकपद सहकार खात्याने रद्द केले आहे, त्यामुळे त्यांना हि चांगलीच चपराक मानली जात आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघेही एसटी बँकेवर तज्ञ संचालक म्हणून काम पाहत होते मात्र ते आता आपल्या पदावर राहू शकणार नाहीत.
दरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाही. तर सर्वसाधरण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की आता ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी याबाबत तक्रार केली होती.
एसटी कॉपरेटिव्ह बँकेवर ‘जेव्हापासून सदावर्ते यांची सत्ता आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू त्यांनी निर्णय घेतला होता आणि अशी शंकाच आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. खरंतरं एसटी कर्मचारी हवालदिल झाला आहे. गेल्या ८ महिन्यांपासून आम्हाला कर्ज मिळत नाही. अशातच सर्वसाधरण सभेत जे पोटनियम बदलायचे होते त्यांची माहिती सभासदांना दिली नाही. यासंदर्भातील तक्रार मी सहकार आयुक्तांकडे केली होती’, असं संदीप शिंदेंनी सांगितले.
सहकार विभागाने शिंदे यांची तक्रार मोठी गांभीर्याने घेतली आहे, तसेच च्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार ७ ते १० तारखेला होत होते ते आता होतात कि नाही हे सांगता त्येत नाहीत कारण कि एसटी विभागाकडून सरकारला काही रकम देणे आहे, टी दिली तर पगार कसा करायचा हा यक्ष प्रश्न आता उभा राहिला आहे. दरम्यान सदावर्ते कुटुंबाला सहकार विभागाने चांगलाच डंका दिला आहे, त्यामुळे आता तरी कामकाज सुधालरेल अशी आशा आहे.