ॲस्ट्राझेनेकाकडून जगभरातील कोव्हिड लशी माघारी

ॲस्ट्राझेनेकाकडून जगभरातील कोव्हिड लशी माघारी
कोविड वॅक्सीन vaccine news – ॲस्ट्राझेनेका कंपनीने जगभरातील आपल्या कोव्हिड लशी माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीत या निर्णयाला पूर्णतः व्यावसायिक निर्णय असे म्हटले आहे. या कंपनीने म्हटलंय की कोव्हिडच्या नव्य़ा व्हेरिएंटवर काम करणारी दुसरी लस बाजारात आल्यानंतर त्यांची मागणी घटली आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान या कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटिश कोर्टात जमा केलेल्या कागदपत्रात आपल्या लशीचे काही लोकांवर विपरित परिणाम होऊ शकतात असं पहिल्यांदाच मान्य केलं होतं. कोरोनाची लस घेणाऱ्या अनेक लोकांनी या कंपनीवर साईड इफेक्ट्समुळे खटले दाखल केले आहेत. हे खटले दाखल करणाऱ्यांमध्ये या लशीमुळे आपल्या नातेवाईकांना गमावणारे किंवा गंभीर त्रास भोगावे लागलेले लोक आहेत.
तसेच या लसीमुळे साईडइफेक्ट होत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला गेला असावा, आणि अनेकांनी या कंपनीविरोधात देखील निर्णय घेतल्याने हे पाऊल कंपनेने उचलले असावे.