अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सोने – चांदीच्या भावात वाढ !

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सोने - चांदीच्या भावात वाढ !
GOLD NEWS 2024 – गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे – चांदीचे दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. त्यांत आता अक्षय तृतिया जवळ आली आहे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं आणि चांदी महागलं आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोनं आणि चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विचार करून करा … नाहीतर खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
दरम्यान काही दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात प्रतिकिलो 1100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता चांदीचा दर प्रतिकिलो 82 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. तर सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोनं आता प्रतितोळा 72 हजार 300 रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळे आता सोने खरेदी कण्याचा विचार असेल तर विचार करावा लागणार आहे. मात्र सोने चांदी कितीही महाग झाले तरी अक्षया तृतियेला सोने करण्याकडे लोकांचा जास्त काळ असतो.