माधुरीचा अल्याड -पल्याड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

माधुरीचा अल्याड -पल्याड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
madhuri pawar news – प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार हिचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटातही आपल्या नृत्याचा जलवा ती बिखरताना दिसणार आहे, या चित्रपटातील माधुरीच्या मोहक आणि दिलखेचक अदांनी भरलेले ‘दणक्यात साजरा करूया जागर नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच’ असे बोल असलेले हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना हायसे वाटणार यात काही नवल नाही.
या चित्रपटातील हे हे गीत शार्दूल यांनी लिहिलं असून ऋचा कुलकर्णी आणि शार्दूल यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. वी.आर. ऋग्वेद याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. हे गाणे करताना आपल्याला मज्जा आली आणि प्रेक्षकांसाठी यापुढेही चांगले गाणे देण्याचा प्रयत्न असणार हे असे माधुरी यांनी सांगितले. हा चित्रपटात ग्रामीण भागातील चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.