… आता विठ्ठल दर्शन पुन्हा सुरु ; वाचा मंदिर आणि इतर माहिती

… आता विठ्ठल दर्शन पुन्हा सुरु ; वाचा मंदिर आणि इतर माहिती
VITTHAL DARSHAN NEWS – राज्यातील तसेच देशातील वारकऱ्यांचे दैवत असलेले, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २ जून पासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. १५ मार्चपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते. मंदिर जतन आणि संवर्धनाची कामे सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते. मंदिराचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, उर्वरित ३० टक्के कामासाठी अधिक कालावधी लागणार आहे. मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे, दारम्यान मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली, त्यानंतर औसेकर यांनी हि माहिती दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माहिती
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. श्री विठ्ठलास महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे. पंढरपुरास “दक्षिण काशी” असेही म्हणतात.
मंदिराचा इतिहास
या मंदिराचा नेमका इतिहास माहीत नसला तरी 13 व्या शतकापर्यंत याचे अस्तित्व असल्याचे पुरावे आहेत. पुंडलिकाची भक्ती आणि विठ्ठलाचे त्याच्यावर प्रसन्न होण्याच्या कथेमुळे या मंदिराची ख्याती आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
हे मंदिर हेमाडपंती शैलीतील बांधलेले असून आठ प्रवेशद्वारे आहेत. गाभाऱ्यात श्री विठ्ठल आणि रखुमाईची मुर्ती आहे. विठ्ठलाला सावळ्या रंगाचा तरुण दाखवले जाते. तो उजवा हात कटीवर ठेवून विटेवर उभे असतो. रखुमाई माता त्याच्या बाजूला असते. मंदिराच्या परिसरात तुळशीराम तीर्थ, राधाकृष्ण मंदिर, नामदेव पायरी इत्यादी अनेक ठिकाणे आहेत.
वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारी
पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख केंद्र आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती गायली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे मोठी वारी (पंढरपूर यात्रा) भरते. लाखो भाविक पायी चालत येथे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. वारकरी – भाविकभक्त येथे मोठया भक्ती भावाने येत असतात हे स्थान पंढरपूर मध्ये येते, विठ्ठल दर्शन वेळ हि सकाळी ४:३० वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत असते, येथे मंदिराच्या परिसरात आणि शहरात अनेक धर्मशाळा आणि निवासस्थाने आहेत याचा भक्तांना निवासासाठी उपयोग होतो.