सूर्यनमस्कार केल्याने आरोग्यास हा होईल फायदा … जाणून घेऊया इतिहास, फायदे, तोटे व इतर माहिती

सूर्यनमस्कार केल्याने आरोग्यास हा होईल फायदा … जाणून घेऊया इतिहास, फायदे, तोटे व इतर माहिती
सुनिल कोल्हे
SURYANAMASKAR 2024 – सूर्यनमस्कार हा योगाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्याचा फायदा हा आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या नोरोगी ठेवण्याचे काम करते. तसेच अध्यात्मिक ऊर्जा देखील देते. भारत देशासह जगभरात सूर्यनमस्कार मोट्याप्रमाणावर करण्यात येतो, योग गुरु प्रामुख्याने सूर्यनमस्कार करण्यास सांगतात.याचे एकूण १२ प्रकार आहेत. याची विस्तृत आणि योग्य अशी माहिती येथे देण्यात आलेली आहे.
सूर्यनमस्काराचा इतिहास…
सूर्यनमस्कार का योगाचा एक परिपूर्ण असा भाग आहे, याचा उगम हा प्राचीन भरतात झाला आहे, याचा उल्लेख प्रामुख्याने वेद आणि पुराणांमध्ये आढळतो. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याची परंपरा आहे. ऋग्वेदामध्ये सूर्याची स्तुती करणारे अनेक श्लोक आहेत. अनेक पुराणांमध्ये देखील सूर्यनमस्काराचा महत्त्वाचा उल्लेख आहे. दरम्यान मध्य युगात अनेक राजघराण्यांच्या सूर्यनमस्काराची उपासना केली जात होती, यायुगातील अनेक ग्रंथांमध्ये सूर्यनमस्काराचे विविध फायदे आणि त्याचे विविध प्रकार यांची माहिती दिली गेली आहे. सुमारे २० व्या शतकात स्वामी शिवानंद यांनी सूर्यनमस्काराला पुनःजीवित केले. आणि त्यानंतर सूर्यनमस्कार हे योग आसनांपैकी एक आसन बनले आणि याचा भारतासह जगभरात प्रसार आणि प्रचार झाला. वैज्ञानिकदृष्ट्या देखील याचा फायदा होत आहे.
सूर्यनमस्काराचे फायदे खालीलप्रमाणे –
शारीरिक फायदे:
१) सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे जो शरीराच्या प्रत्येक भागाला सक्रिय करतो.
२) नियमित सरावाने स्नायू आणि सांध्यांची लवचिकता वाढते.
३) सूर्यनमस्काराने स्नायूंना बळकट होतात, विशेषतः पोट, पाठ, पाय आणि हातांच्या स्नायूंना याचा उपयोग होतो.
४) सूर्यनमस्कार एक उत्कृष्ट कार्डियोवस्क्युलर व्यायाम आहे, जो कॅलरी जाळून वजन कमी करण्यात मदत करतो.
५) सूर्यनमस्कार हे पचनसंस्था सक्रिय करते आणि पचन सुधारण्यात मदत करते.
६) सूर्यनमस्कार हे फुफ्फुसांची क्षमता वाढवते आणि श्वसनसंस्थेला बळकट करते.
मानसिक फायदे:
१) सूर्यनमस्कार हे मानसिक शांतता प्रदान करते आणि तणाव आणि चिंता कमी करते.
२) सूर्यनमस्काराच्या दरम्यान श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने ध्यान आणि एकाग्रता वाढते.
३) सूर्यनमस्काराच्या मेंदूत सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मूड देखील सुधारतो.
इतर फायदे:
१) सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराच्या विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात त्याची मोठी मदत होते.
२) सूर्यनमस्कार हे शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यात मदत करते.
३) यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
सूर्यनमस्काराचे तोटे कोणते आणि कोणासाठी …
योग्य तंत्राचा अभाव म्हणजेच माहिती नसेल तर सूर्यनमस्कार करू नये, पाठीच्या आणि इतर शारीरिक व्याधी असल्यास किंवा दुखण्याची समस्या असेल तर हे करू नये, तसेच हृदयाच्या समस्यांसाठी हे धोकादायक आहे, रक्तदाब असेल तर याच्यामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्लाच फायदेही ठरू शकतो, आणि सूर्यमनस्कर करताना अतिशय लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये सावधगिरीची गरज आहे, गरोदर महिलांनी, गंभीर आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी, आणि सर्जरीनंतर पुनर्वसनाच्या काळात असलेल्या लोकांनी सूर्यनमस्कार करणे टाळावे किंवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार ते करावे, त्यामुळे कोणत्याहीप्रकारचा धोका आपल्याला संभवणार नाही.
सूर्यनमस्काराचा आजच्या काळातील उपयोग
अनेक शाळांमध्ये सूर्यनमस्कार हा शारीरिक शिक्षणाच्या भाग म्हणून शिकवला जातो, अनेक प्रकारची योग शिबिरे, आणि क्लासेस येथे देखील सूर्यनमस्कार शिकवलं जातो.

सूर्यनमस्काराची आसने:
प्रणामासन (नमस्कार मुद्रा),
हस्त उत्तानासन (हात वर)
पादहस्तासन (हात पायांकडे)
अश्व संचलनासन (घोड्यासारखी मुद्रा)
दंडासन (ताठ शरीर)
अष्टांग नमस्कार (आठ अंगांचे स्पर्श)
भुजंगासन (साप मुद्रा)
अधो मुख श्वानासन (श्वान मुद्रा)
अश्व संचलनासन (घोड्यासारखी मुद्रा)
पादहस्तासन (हात पायांकडे)
हस्त उत्तानासन (हात वर)
प्रणामासन (नमस्कार मुद्रा)
सूर्यनमस्कार हा योगाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी प्रकार आहे. याच्या नियमित सरावाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. भारतीय योग परंपरेतील हा मौल्यवान वारसा आधुनिक जीवनशैलीत तणाव आणि शारीरिक समस्या कमी करण्यासाठी याचा चांगल्याप्रमाणात फायदा होतो. सूर्यनमस्कार कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. फक्त यासाठी योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, ज्यामुळे इतर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.