अखेर प्रतीक्षा संपली : बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी होणार जाहीर

बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के; कोकण विभागाची बाजी
HSC RESULT 2024 – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार दि. २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान या निकालावरच अनेकांचे भविष्य ठरणार आहे. विद्यार्त्याना आपला निकाल हा महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला झाली होती. बारावीसाठी एकूण सुमारे 14 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विविध इंट्रान्स परीक्षा पार पडल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक हे निकालाची वाट सतत पाहत होते, मात्र हि प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. राज्यात किती टक्के निकाल लागेल, मुली कि मुले बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोणत्या शाखेचा किती टक्के निकाल लागणार यासाठीची उत्सुकता विद्यार्थी तसेच पालकांत आहे. कारण निकाल लागल्यानंतर आपल्या पाल्याला कोणत्या शाखेत पुढील शिक्षणासाठी पाठवायचे हे स्पष्ट होणार आहे.