आरोग्यवर्धक कांदा : मानवास होणारे विविध गुणकारी फायदे

आरोग्यवर्धक कांदा : मानवास होणारे विविध गुणकारी फायदे
सुनिल कोल्हे
ONION HEALTH BENEFITS 2024 – कांदा हा प्रत्येकाच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे विविध प्रकारे आरोग्यदायी फायदे आहेत. कांदा हा सर्वप्रथम मध्य आशिया, विशेषतः इराण, पाकिस्तान आणि पश्चिम भारतातील प्रदेशांमध्ये आढळून आला. त्याची लागवड हि जगभरात होते, मात्र भारत, चीन, अमेरिका आणि इजिप्त हे कांद्याचे प्रमुख उत्पादक देश म्हणून गणले जातात. कांदा हा गुणकारी असून तो जसा प्रत्येकाच्या आहारात दिसतो तसाच त्याचा प्राचीन इतिहासापासून ते आतापर्यन्त औषध म्हणून देखील वापर होताना दिसत आहे.
कांद्याचे आरोग्यवर्धक फायदे खलिलप्रमाणे :
१) बॅक्टेरिया आणि फंगस यांच्याशी लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे इन्फेक्शनपासून रोखले जाते.
२) रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
३) कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि सल्फर असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
४) पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
५) कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते.
६) रक्तातील शुगरची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते, तसेच डायबिटीजचा त्रास कमी होतो.
७) त्वचेचा रंग सुधारतो आणि त्वचेचे आरोग्य टिकून राहते.
८) केसांची वाढ सुधारते आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
९) यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
१०) कांद्याचा रस व मध यांचे सेवनाने घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
कांदा आपल्या आरोग्य सुध्यारण्यासाठी मोठे फायद्याचा आहे, त्याचा उपयोग भारतासह जगभरात भाजीमध्ये तसेच वेग्वेगळ्याप्रकारे उपयोग करून आहार घेतला जातो. प्राचीन इतिहासात देखील कांद्याला अनन्यसाधारण महत्व होते. याचा भाजी, औषधे आणि इतर ठिकाणी वापर केला जात होता. आज कांद्याचा हवा तास उपयोग केला जात आहे. हा लेख म्हणजे प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा तंज्ञांचा सल्ला घ्यावा.