श्रीगोंदा : देवदैठण येथील “हर घर जल” योजनेला घरघर ; वाघमारे यांचा उपोषणाचा इशारा

0
Devdaithan Photo

श्रीगोंदा : देवदैठण येथील "हर घर जल" योजनेला घरघर ; वाघमारे यांचा उपोषणाचा इशारा

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील देवदैठण येथील भारत सरकारच्या “हर घर जल” या योजनेला घर घर लागली आहे. ग्रामपंचायतचे सांडपाणी “जल-जिवन”च्या विहरीत सोडल्याने ग्रामस्थामध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी आणि सबंधित विभागाकडे तक्रार दिली आहे. प्रश्न सुटला नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा देखील देण्यात आला आहे.

देवदैठण येथील सिद्ध नदीवर ग्रामपंचायत मार्फत केंद्र सरकारच्या योजनेमधून जल जीवन योजनेच्या विहारीचे काम झाले आहे. सदर विहिरीचे काम चालू झाल्या पासून वेळोवेळी ग्रामपंचायतला सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत मार्फत कुठलीही दखल घेतली गेली नाही. नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळण्यासाठी लाखो रुपये शासनाचे खर्च झाले आहेत. अनेक वर्षापासून देवदैठण येथील सांडपाणी या सिद्ध नदीत सोडण्यात आले होते. सध्या जिथे हे सांडपाणी सोड्यात आले आहे त्याखाली शंभर फुटावर जल जिवनच्या विहारीचे काम झाले आहे. सोडण्यात आलेले दुषित पाणी सिद्ध नदीमधील वाळूत झिरपून तेच पाणी विहरीत उतरत आहे. सांडपाणी सोडलेली जागा आणि जलजीवन विहारीची जागा या जवळच आहेत .याबाबत ग्रामपंचायतला माहिती असूनही शासनाचा निधी लाटण्यासाठी इथेच विहीर बांधकाम करण्यात आले असल्याचा आरोप देखील वाघमारे यांनी केला आहे. तसेच यामुळे भविष्यात नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे योग्य ती सोय लावावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केलं

तर बेमुदत उपोषण करणार
केंद्र सरकारच्या चांगल्या योजनेचे झालेले निकृष्ठ कामाला स्थानिक पदाधिकारी जबाबदार आहेत. कोटीच्या कामात लाखोंचा मलिदा अधिका-यांनी लाटला आहे. पुढील काही वर्षाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून हि योजना राबवली आहे. अधिकारी तक्रारीची दाखल घेत नाहीत. यामुळे जलजीवन नाही तर जनजीवन उध्वस्थ केले आहे, त्यामुळे योग्य निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला नाही तर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा सतीश वाघमारे यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.