मराठी “बिग बॉस” उद्यापासून प्रेक्षांच्या भेटीला !

मराठी "बिग बॉस" उद्यापासून प्रेक्षांच्या भेटीला !
MARATHI BIG BOSS 2024 – बिग बॉस मराठीचा पाचवा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या शोची पहिली झलक ही मंगळवार दि. 21 मे रोजी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून मराठी प्रेक्षक ज्या रियालिटी शो ची वाट पाहत होते, ती आत शमणार असून मराठीतील पुढील बिग बॉस कोण आणि हा शो कधीपासून प्रदर्शित होईल याची उत्सुकता शमणार आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे कि, “सर्व रियालिटी शोजचा बाप,पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला” त्यामुळे डोळे लावून वाट पाहणाऱ्या मराठीतील प्रेक्षकांचा लाडका शो मराठी बिग बॉस याची पहिली झलक आता उद्या सकाळी 10 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. आता या शो मध्ये नेमक्या कोणत्या नव्या कलाकरांची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कोणते कलाकार यामध्ये असणार हे मात्र अद्याप समोर आलेले नसले तरी तेही लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे, यामुळे उद्या सर्वांची उत्सुकता शमणार आहे. अर्थातच सर्वांचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर याला होस्ट करणार आहेत.