बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के; कोकण विभागाची बाजी

बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के; कोकण विभागाची बाजी
HSC BOARD RESULT 2024 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असुन यावर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला आहे. एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याबाबतची माहिती शिक्षण मंडळाकडून (बोर्ड) देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे. अधिसूचनेनुसार, बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेत स्थळावर दुपारी 1 वाजेनंतर पाहता येणार आहे.
यावर्षी बारावीचा निकाल लागला यामध्ये सुमारे 8782 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर यंदा केवळ एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण मिळाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या रेणुकाला 100 टक्के गुण
छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या मुलीला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहेत. रेणुका बोरमणीकर असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती देवगिरी महाविद्याची विद्यार्थिनी आहे. ईथेच ती शिक्षण घेत होती. तिच्या या यशाबद्दल शिक्षण मंडळाने आणि देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
कोकण विभागाची बाजी
दरम्यान बारावीच्या निकालात पुन्हा कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त 97.51 टक्के इतका लागला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, छत्रपती संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागला आहे.