CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
CBSE board Class 12th Result 2024 – सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सुमारे 88 टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 0.65 टक्के निकालात वाढ झाली आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल आज जाहीर केला. देशभातून सुमारे 24000 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर 1.16 लाख विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. सीबीएसई बोर्डाचा निकाल हा विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाईन पाहता येणार आहे. आणि तो https://cbseresults.nic.in/ या लिंकवर पाहायला मिळणार आहे