मान्सून महाराष्ट्रात कधी येणार ! पंजाबराव डंख याचा अंदाज

मान्सून महाराष्ट्रात कधी येणार ! पंजाबराव डंख याचा अंदाज
MONSOON NEWS 2024 – हवामान विभागाकडून वेळोवेळी मान्सून बद्दल अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यातच राज्यात कधी तापमान वाढते तर कधी वादळी वाल्याच्या पाऊस होत आहे. वातावरणात सारखा बदल होत आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वानाच पडतो आहे. देशात चांगला पाऊस होईल असे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी यावर्षी राज्यात पाऊस कधी येईल? पावसाळा कशाप्रकारे असेल? याबाबत माहिती दिली आहे.
अंदमान निकोबारमध्ये मान्सून पोहचला आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये आणि जवळच्या राज्यात दाखल होईल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल, मात्र ३ ते ४ दिवसांचा अंतर यामध्ये असू शकते, अशीही शक्यता डंख यांनी सांगितली आहे. साधारणतः 28 मे ते 3 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तसेच 9 ते 16 जूनच्या दरम्यान राज्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने दखल वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच मान्सूनची वाट मोट्या आतुरतेने पाहत आहेत.
दरम्यान एल निनो हा मागील वर्षी सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळ भारतात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. मात्र यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे. येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच पंजाबराव डंख यांनी देखील पाऊस चांगला पडणार असल्याची सांगितले आहे. गेल्यावेळी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका हा शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे बसला. यावर्षी तरी चांगला पाऊस होणार असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.