रेल्वेचा प्रवाशांसाठी १० लाखाचा विमा, अपघात झाल्यास किती मिळते भरपाई आणि इतर माहिती

रेल्वेचा प्रवाशांसाठी १० लाखाचा विमा, अपघात झाल्यास किती मिळते भरपाई आणि इतर माहिती
RELWAY TRAVEL INSURANCE – भारतीय रेल्वे, प्रवाशांसाठी रेल्वे ट्रॅव्हल (प्रवास) इन्शुरन्स देते. हा विमा म्हणजेच इन्शुरन्स रेल्वे प्रवासादरम्यान अपघात, इजा किंवा इतर आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून प्रवाशांचे संरक्षण करणारा विमा आहे. या विम्याचा लाभ त्या प्रवाशांना मिळतो. जे तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडतात. अनेक प्रवाशांना या विम्याविषयीची माहिती नसते. तिकीट खरेदी करताना हा विमा खरेदी करावा लागतो. तरच त्याचा फायदा प्रवाशांना मिळतो. या विम्यासाठी प्रवाशांना केवळ 45 पैसे अधिकचे द्यावे लागतात.
काय आहे हा विमा, तो कसा घेतात ?
रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स, रेल्वेचा प्रवास विमा, संरक्षण हे ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करण्याऱ्या प्रवाशानाच मिळते. जर कोणी प्रवाशी ऑफलाईन, म्हणजे तिकीट खिडकीवरुन तिकीट बुक करत असेल तर त्याला विम्याचा लाभ मिळत नाही. विमा घ्यायचा की नाही, हे पूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून असते. रेल्वे प्रवासी विम्यासाठी केवळ 45 पैसे एवढाच प्रीमियम भरावा लागतो. जनरल कोच वा डब्ब्यांतील प्रवाशांना विम्याचा लाभ देण्यात येत नाही.
हा विमा घेताना हे मुद्दे लक्षात घ्यावेत :
तिकीट बुक करताना IRCTC च्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अॅपवर “ट्रॅव्हल इन्शुरन्स” हा पर्याय निवडावा लागतो. तिकीट बुकिंगच्या तारखेपासून प्रवास संपेपर्यंतचा कालावधी यामध्ये कव्हर केला जातो. दरम्यान अपघाताच्या घटनेची माहिती हि अपघात झाल्यास, प्रवाशाने त्वरित रेल्वे प्रशासनाला द्यावी तसेच विमा कंपनीकडून दिलेला दावा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावा त्यमंतर साम्बबंधित विमा कंपनी तपासणी करून, योग्य असल्यास दाव्याची रक्कम संबंधित प्रवाशाच्या खात्यात जमा करते.
रेल्वे प्रवास विमा घेण्याने प्रवाशांना अनपेक्षित घटनांमध्ये आर्थिक संरक्षण मिळते, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने तिकीट बुक करताना हा पर्याय निवडणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.