नगरदक्षिणचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड?

नगरदक्षिणचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड ; निलेश लंके प्रतिष्ठानकडून विडिओ व्हायरल
निलेश लंके प्रतिष्ठानकडून विडिओ व्हायरल
अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मात्र आता ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामात छेडछाड करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्यात दि. १३ मे रोजी पार पडली. मात्र आता दक्षिण लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशीन मशीन ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याची घटना घडली आहे. त्याचा एक विडिओ निलेश लंके प्रतिष्ठानकडून समोर आणला असून तो व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलीस आणि महसूल यंत्रणा यांच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षाकडून माजी आमदार निलेश लंके तर भाजप पक्षाकडून खा. सुजय विखे यांच्यात रंगतदार निवडणूक झालेली पाहायला मिळाली, दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र नोवडणूक झाल्यानंतर आता नगर येथे ईव्हीएम मशीन मशीन ठेवलेल्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड केली असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या गोदामाच्या ठिकाणी निलेश लंके यांचे कार्यकर्ते कोणतीही अनुचित घटना येथे घडू नये यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. निलेश लंके प्रतिष्ठान कडूनच हा विडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आहे आहे. तसेच पोलीस आणि महसूल यंत्रणा याच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत पोलीस किंवा निवडणूक यंत्रणा यांच्याकडून कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
निलेश लंके निवडणूक आयोगाकडे जाणार
लोकसभेचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके हे या घटनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मात्र निलेश लंके यांनी याबाबत नाराजी ब्यक्त केली असून आपल्या प्रतिष्ठानच्या यंत्रणेने हा डाव हणून पडला आहे. पोलीस यंत्रणेला भेदून व्यक्ती तेथपर्यंत जातो आणि आपली यंत्रणा देखील सजग राहून विरोधकांचा डाव उधळून लावतो यातच आपला विजय आहे.
निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अधिपत्याखाली पोलीस आणि निवडणूक यंत्रणा हि काम करते. मात्र याप्रकारे घटना घडत असतील आणि कोणीही याबाबत स्पष्टीकरण देत नसेल तर संबंधितांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह हे उभा राहणारच. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात उलटसुलट चर्चा रंगताना दिसत आहे.
प्रशासनाकडून अधिकृत व्यक्ती असल्याची माहिती
ज्या व्यक्तीने ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्या ठिकाणी दुरुस्थी आणि देखभालीसाठी गेला होता, तो अधिकृत व्यक्ती असून त्याची रीतसर नोंद रजिस्टर ला आहे अशी माहिती प्रशासनाकडून उशिरा देण्यात अली आहे.
डॉ. सुजय विखे यांची कोणतीही प्रतिक्रिया नाही
डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत, सीसीटीव्ही विडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली, आपली यंत्रणा चांगली काम करत असल्याने यांचे असले प्रकार उघडकीस येत असल्याचे म्हटले आहे. मात्र विखे यांच्याकडून याबाबत कोणतीच प्रतिक्रिया उशिरापर्यंत देण्यात आलेली नव्हती.
