दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार

दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार
SSC RESULTS 2024 – बारावीचा निकाल 21 मे रोजी राज्य मंडळाने जाहीर केला. मात्र आता दहावीच्या निकालाची वाट विद्यार्थ्यांसह पालक पाहत आहेत त्यांची हि प्रतीक्षा आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हि माहिती दिली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://mahahsscboard.in/ वर पाहता येणार आहे. तसेच “mahresult.nic.in” यावर देखील निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढणार आहे. तसेच पालक देखील पुढील निर्णय या निकालानंतर घेतील.