मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राऊतांना नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राऊतांना नोटीस
SANJAY RAUT NOTICE – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फ संजय राऊत यांना ही मानहानीची नोटीस पाठवणयात आली आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर नोटीस शेअर केली आहे. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा म्हणत त्यांनी शिंदे यांच्या नोटीसची खिल्ली उडवली आहे. मजेशीर राजकीय पत्र असा उल्लेख राऊत यांनी केला आहे.
जॉईन करा बातम्या आणि जाहिरातींसाठी : सह्याद्री Express या WHATSAPP CHANNEL
दरम्यान सामना या वृत्तपत्राच्या माध्यमातून बदनामीकारक बातम्या प्रकाशित करून, प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुमच्या निहित राजकीय आणि स्वार्थासाठी तुम्हाला बदनामी करण्याची परवानगी नाही. असे नोटिसीमध्ये म्हटले आहे, तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर पैसै वाटल्याचा आरोप केला होता, असे देखील त्यात म्हटले आहे. त्यामुळे तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा थेट इशारा नोटीसच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना देण्यात आला आहे.
५० खोके एकदम ओके
50 खोके एकदम ओके, याला म्हणतात ऊलटा चोर कोतवाल को डाटे, म्हणत गैरसंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खूपच मनोरंजक आणि हास्यास्पद राजकीय डॉक्यूमेंट आहे, आता खरी मजा येणार, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे याना डिवचले आहे.