एचडीएफसी बँकेचा मोठा निर्णय : UPI व्यवहारांवरील एसएमएस सेवा होणार बंद !

एचडीएफसी बँकेचा मोठा निर्णय : UPI व्यवहारांवरील एसएमएस सेवा होणार बंद !
HDFC BANK SMS ALERT 2024 : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या २५ जून २०२४ पासून १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या UPI व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट सेवा बंद करणार आहे. मात्र ईमेल सेवा आहे तशीच सुरु राहणार आहे.
हेही वाचा : “माधुरी दीक्षित”चं सौंदर्य आजही घायाळ करणार; जाणून घेवूया फिटनेस मंत्रा
देशातील सर्वच बँका आता आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन व मोबाइल बँकिंग सेवा देत आहेत. ग्राहकाने केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा एसएमएस अलर्ट आणि ई-मेल सूचना हा त्याचाच एक महत्वपूर्ण भाग आहे. एचडीएफसी ही बँकही त्यास अपवाद नाही. आतापर्यंत ही बँक १ रुपयांच्या व्यवहाराचाही एसएमएस किंवा ईमेल अलर्ट पाठवत होती, मात्र त्यामुळे ग्राहकांना आपण केलेल्या व्यवहाराची माहिती तात्काळ मिळत होती. आता मात्र यात काही प्रमाणात बदल करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे.
हेही वाचा : आयकर विभागाचा अलर्ट ; आधार-पॅन लिंक नसल्यास करदात्यांना भरावा लागणार दंड
दरम्यान, आता १०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी किंवा UPI द्वारे ५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यासच ग्राहकांना एसएमएस मिळणार आहेत. मात्र ईमेल सेवा सुरूच राहणार आहे. साधारणतः बँका दररोज सरासरी ४० कोटी एसएमएस पाठवतात. असे काही निर्णय घ्यावे लागत असले तरी यामध्ये ग्राहक हित पहिले जाते.