“आव्हाड” यांची पक्षातून हकालपट्टी करावी; महसूलमंत्री विखे यांची मागणी

पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला कुकडीचे आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा : पालकमंत्री विखे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फडणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राजकारणासाठी डाॅ. आंबेडकरांच्या नावाचा वापर करणाऱ्या स्टंटबाज नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून हाकलपट्टी करावी आशी मागणी ना. विखे यांनी केली आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, भावनेच्या भरात आपण काय करतो? याचे भान राहीले नसलेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, डाॅ आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना या घटनेमुळे दुखावल्या गेल्या आहेत.
तसेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचे सामाजिक, राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू केले आहेत. राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने आशी कृत्य करून प्रसिध्दी मिळविण्याचा हव्यास करताना आ.आव्हाड यांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुध्दा पुरली नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आ.आव्हाड यांची तातडीने पक्षातून हाकलपटी केली पाहीजे आशी मागणी करून, भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे हे चेहरे सुध्दा आज या घटनेमुळे राज्याला समजले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.