राज्यातील शिक्षक बीएलओना निवडणूक आयोगाकडून १५० रुपये मानधन

0
Nivadnuk Ayog

राज्यातील शिक्षक बीएलओना निवडणूक आयोगाकडून १५० रुपये मानधन

BLO news – लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची यादी तयार करण्यापासून ते मतदान कार्ड घरोघरी पोहोचवण्यापर्यंतची सर्व कामे बूथ लेव्हल अधिकारी (बिएलओ) म्हणजेच शिक्षकांनी केली आहेत. असे असतानाही निवडणूक आयोगाकडून बीएलओंची थट्टा केली असून सुमारे १०० दिवसांच्या कामासाठी बीएलओ अधिकाऱ्यांना नाममात्र 150 रुपये मानधन देण्यात आले आहे. आतापर्यंत देशात सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे. १ जून रोजी आता सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने बिएलओ अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान शिक्षकांकडे शाळेतील कामाचा बोजा असतानादेखील त्यांना प्रत्येक निवडणुकीवेळी निवडणुकीच्या कामांसाठी जुंपले जाते. यंदाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना फेब्रुवारीपासूनच निवडणुकांची कामे देण्यात आली. याशिवाय जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत, संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली होती. त्यामुळे कारवाईच्या भीतीने शिक्षकांनी आपले प्रामाणिकपणे काम केले, मात्र आयोगाच्या या भूमिकेमुळे फक्त १५० रुपये एवढेच मानधन बीएलओ यांना देण्यात आले आहे. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मानधन वाढवून द्यावे अशी मागणी देखील केल्याचे समजतेय.

अहमदनगर बिएलओना अदयाप मानधन नाही

गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षक बिएलओ लोकसभा निवडणुकीचे काम करत आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील  या बिएलओना अद्याप मानधन देण्यात लालेले नाही. राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षक बिएलओ यांना १५० रुपये  एवढे मानधन देण्यात आले आहे. त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील बिएलओ यांना किती मानधन मिळणार? हा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने यामध्ये बदल करून मानधन वाढवून द्यावे अशी मागणी केली जात असल्याचे समजतेय.

शिक्षकांनी तीन महिने बीएलओ म्हणून केलेली कामे

मृत, दिव्यांग आणि स्थलांतरित व्यक्ती शोधून त्याचे अहवाल देणे, नवीन मतदार नोंदणी करणे, वयोवृद्धांसाठी गृह मतदान प्रक्रिया राबविणे, यासाह निवडणूक आयोगाचे अधिकारी सांगतील ती सर्व कामे, मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे त्या मतदारांना काढून देणे आदी  प्रकारची कामे बीएलओ यांनी केली आहेत.

अधिकारी –बिएलओ यांच्यात फरक

केवळ एक दिवसाच्या कामासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना 1300 ते 2000 इतके मानधन दिले जाते. असे असताना बीएलओंना तीन महिन्यांसाठी केवळ 150 रुपये कसे काय? केलेल्या कामाचे आणि मानधनाचे गुणोत्तर कशाच्या आधारावर ठरवले? असा संतत्प सवाल बीएलओ याच्याकडून उपस्थित केला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.