पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला कुकडीचे आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा : पालकमंत्री विखे पाटील

पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला कुकडीचे आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा : पालकमंत्री विखे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांच्या मागणीवरून कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हााळी हंगामातील दुसरे आवर्तन आज दि.३० मे रोजी दुपारी ४ वा. पासून सुरू करण्यात आले असल्याचीमाहिती पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कडीच्या आवर्तनाबाबत यापुर्वीच आवर्तनाच्या नियोजना संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकी मध्ये आवर्तनाची तारीख नंतर ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आवर्तन सोडण्यासंदर्भात वेळोवेळी कालवा सल्लागार समितीची बैठक देखील झाली मात्र, सोलापूर आणि अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी पाणी टंचाई असल्याने पाणी सोडण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याण्या बाबत तातडीने निर्णय घ्येण्यासंदर्भात सुचना दिल्या दिल्या होत्या. त्यानुसार आज गुरुवार ३० मे रोजी कुकडीचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र . उन्हााची तिव्रता लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करण्याचे अवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
दरम्यान माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांनी देखील कुकडी डावा उन्हाळी नंबर २ चे आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती आपल्या “एक्स” म्हणजेच twiter वर दिली आहे.
५४ गावांचा प्रश्न मार्गी लागणार : पवार
कालवा सल्लागार समितीत केलेल्या मागणीनुसार आणि नंतर पुन्हा विनंती केल्यानुसार अखेर आज कुकडीचं दुसरं उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं. यामुळं मतदारसंघातील ५४ गावांना पिण्यासाठी तसंच चारा व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या आवर्तनाचा उपयोग होणार असून पुढील १५ ते २० दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. तसेच याबाबत जलसंपदा विभागाचे आभार देखील त्यांनी मागितले आहेत.
1 thought on “पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला कुकडीचे आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा : पालकमंत्री विखे पाटील”