कर्नाटकच्या कांद्याला ४० टक्के निर्यात शुल्कातून वगळले : केंद्राचा निर्णय

कर्नाटकच्या कांद्याला ४० टक्के निर्यात शुल्कातून वगळले : केंद्राचा निर्णय
ONION NEWS – केंद्र सरकारने कर्नाटकच्या बेंगलोर रोझ कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात शुल्क कायम असताना कर्नाटकमधील कांद्याला सवलत दिल्याने राज्यासह देशात मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने घातलेल्या कांदा निर्यातबंदीवरुन राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. केंद्र सरकारच्या या निर्णायाविरोधात शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. त्यानंतर केंद्रसरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ४० टक्के निर्यात शुल्क लागु केले होते. यावरुनही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे देशातील कांदा मोठ्याप्रमाणात निर्यात झालाच नाही. कारण ४० टक्के लावलेले निर्यात शुल्क कमी करावे किंवा माफ करावे अशी मागणी केली गेली होती. मात्र आता कर्नाटक येथील कांद्यावरील निर्यात शुल्क माफ करण्यात आले आहे. म्हणजेच ते आता घेतले जाणार नाही.
सरकारचे नेमके धोरण काय?
सरकार, विरोधी पक्ष, विविध संघटना आणि शेतकरी संघटना याना आता शेतकऱ्यांध्ये देणेघेणे राहिलेले दिसत नाही कारण, सरकार शेतकरीविरोधी धोरण गेले आणि पक्ष आणि इतर संघटना बघ्याची भूमिका घेत आहेत असेच चित्र अलीकडील काळात दिसत आहे. शेतकरीच संताप व्यक्त करतो आहे, आंदोलन करतो आहे. सरकारच्या या धोरणाविरुद्ध राज्यात पुन्हा रान उठण्याची चिन्ह या निर्णयामुळे दिसत आहेत.