राज्यातील पब, बार रेस्टॉरंटसाठी राज्य उत्पादन शुल्कचे नवीन नियम लागू ?

राज्यातील पब, बार रेस्टॉरंटसाठी राज्य उत्पादन शुल्कचे नवीन नियम लागू ?
PUNE PORCHE ACCIDENT – पुणे येथील हिट अँड रन प्रकरणानंतर नियमांचे उल्लघंन करणारे पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे. तसे संकेतच आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकी मध्ये पुणे सारखे प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे समजतेय. तसेच यासारख्या प्रकरणांना आळा बसावा यासाठी काही नियम लागू करण्यात येणार आहेत, ते नियम हे राहातील पब आणि रेस्टोरंट यांच्यासाठी असणार आहेत.
read this : कर्नाटकच्या कांद्याला ४० टक्के निर्यात शुल्कातून वगळले : केंद्राचा निर्णय
राज्यउत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेले नवे नियम ?
१) परवाना कक्षा मध्ये २१/२५ वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
२) हॉटेल च्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार आहे.
३) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर पब किंवा टेस्टोरन्ट सुरू असल्यास कारवाई केली जाणार
४) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात ११ वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
४) महिला वेट्रेस ठराविक वेळेनंतर कार्यरत असल्यास संबधित आस्थापनावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
५) विनापरवाना मद्यसाठा सापडल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठ्याचे सखोल निरीक्षण करावे. आणि कडक कारवाई करावी.
६) कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-१ ट्रेड मधुन कॅश कॅरी स्कीम पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने यापुढे बंधनकारक राहणार आहे.
७) याशिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याचे समजतेय.
८) तसेच स्थानिक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने परिसरातील पब आणि रेस्टोरंटमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची संरचना उत्पादन शुल्क विभागाकडून उभी केली जाणार आहे. दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञान व CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टोरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवली जाणार असल्याचे याबैठकीत ठरले असल्याचे समजते.
1 thought on “राज्यातील पब, बार रेस्टॉरंटसाठी राज्य उत्पादन शुल्कचे नवीन नियम लागू ?”