रेल्वेचा मेगाब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द ; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सूचना

रेल्वेचा मेगाब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द ; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सूचना
RAILWAY MEGABLOCK – मध्य रेल्वे लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 161, शनिवारी 534, रविवारी 235 लोकल फिऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सगळ्यात मोठा म्हणजे 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. तर पुणे आणि नाशिक रेल्वेने देखील आवश्यकता असल्यासच रेल्वेचा प्रवास करा, अन्यथा अन्य पर्यायांचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासन कडून करण्यात आलेले आहे.
मुंबईकरांसाठी तीन दिवस रेल्वे प्रवास जिकारीचा ठरणार आहे. मध्य रेल्वेने शुक्रवार मध्यरात्री १२.३० वाजेपासून महा मेगाब्लॉकला सुरुवात केली आहे. तब्बल ६३ तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे.. रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील १० आणि ११ क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत आहे. तसेच ठाणे स्थानकावरील ५ आणि ६ फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान तब्बल ९३० लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ७२ एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.
Read This : राज्यातील पब, बार रेस्टॉरंटसाठी राज्य उत्पादन शुल्कचे नवीन नियम लागू ?
कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट आहे. रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू असलेला मेगाब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने जम्बो मेगाब्लॉक असणार आहे.
तेसच रेल्वे प्रशासनाच्या आव्हान नंतर अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉम होम’ करण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर पुणे आणि नाशिक रेल्वेने देखील प्रवाशांना रेल्वे प्रवासकरण्या अगोदर वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याच्या सूचना केल्या आहेत.
1 thought on “रेल्वेचा मेगाब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द ; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सूचना”