ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना दिलासा; या कागदपत्रांची क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यकता नाही

ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना दिलासा; या कागदपत्रांची क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यकता नाही
EPFO EMPLOYEE CLAIM NEWS – ईपीएफओने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन एक पत्रक काढले आहे, यापुढे 6 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना क्लेम सेटलमेंट करणे अधिक सोपे होईल. वारंवार या कागदपत्रांची जोडणी करण्याची आता गरज राहणार नाही.
Read This : रेल्वेचा मेगाब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द ; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सूचना
दरम्यान कर्मचाऱ्यांना आता क्लेम सेटलमेंट करण्यासाठी कॅन्सल चेक अथवा बँक पासबुकची झेरॉक्स कॉपी अपलोड करण्याची आवश्यकता नाहीं. सर्व अटी आणि शर्तींचे पालन करणाऱ्या सदस्यांना दावे निकाली काढताना विशेष सवलत देण्यात येणार आहे. हे दोन्ही कागदपत्र योग्य पद्धतीने अपलोड झाले नाही तर दावा फेटाळण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ईपीएफओने 28 मे रोजी याविषयीचे एक परिपत्रक काढले आहे.त्यामध्ये म्हटले आहे कि, दावे निकाली काढण्यासाठी चेक लीफ आणि बँक पासबुकची फोटोकॉपी अपलोड करण्याची गरज यापुढे नसणार आहे. त्यामुळे प्रलंबित दावे पण झटपट निकाली निघतील. सीपीएफसीने या प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. बँक, एनपीसीआयद्वारे बँक केवायसी, ऑनलाईन व्हेरिफिकेशन, आधारचा पडताळा केला आहे. त्यांच्यासाठीच ही सवलत लागू असणार आहे.
1 thought on “ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना दिलासा; या कागदपत्रांची क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यकता नाही”