मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द

पुणे – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केले असून ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. तर एक जामीनदार द्यायला सांगितला आहे. पुण्यातील शिवदजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2012-13 मधील एका प्रकरणात जरांगेंना वॉरंट बजावण्यात आले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर २०१३ साली कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर ते आज दि. ३१ मे रोजी न्यायालयात हजर राहिले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली होती.
अधिक वाचा :ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना दिलासा; या कागदपत्रांची क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यकता नाही
दरम्यान या तक्रारीनुसार कलम १५६(३) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आता सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. यावेळी जरंगे पाटील आणि अधिक बोलणे टाळले.
1 thought on “मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द”