Bank Holidays २०२४ : जूनमध्ये बँकांना 12 दिवस सुट्या

Bank Holidays २०२४ : जूनमध्ये बँकांना 12 दिवस सुट्या
BANK HOLIDAYS : पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात बँकांना सुमारे १२ दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे खातेधारकांनी आपली बँकेशी निगडित सर्व कामे हि नियोजनबद्ध करावीत.
दरम्यान जून महिन्यामध्ये बकरी ईद, वट सावित्री यासह विविध सण तसेच साप्ताहिक सुट्यांमुळे बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमुळे 1 जूनला कित्येक राज्यांतील बँकांना सुटी असणार आहे. या काळात तुम्ही बँकिंग क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे लवकरात लवकर करून घ्यावीत अन्यथा गैरसोय होऊ शकते.