Driving License RULES 2024 : ड्रायव्हिग लायसन्स, वाहतुकीसाठी अद्यापासून नवीन नियम… पहा कशासाठी किती होणार दंड

Driving License RULES 2024 : ड्रायव्हिग लायसन्स, वाहतुकीसाठी अद्यापासून नवीन नियम… पहा कशासाठी किती होणार दंड
DRIVING License RULES : एक जूनपासून (उद्यापासून) वाहतुकीशी संबंधित नवे नियम लागू होत आहेत. यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही. सरकारद्वारे मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याकरिता परीक्षा देऊ शकता. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
READ THIS : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द
दरम्यान वाहतुकीच्या नियमात बदल होणार आहेत, या नव्या नियमांतर्गत 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना 25 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्यासह 25 वर्षे नवीन लायसन्स मिळू शकणार नाही. याशिवाय अन्य नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. भरधाव वेगाने वाहन चालवल्यास एक हजार ते दोन हजार रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल.
त्यामुळे वाहन परवाना आणि वाहतुकीचे नवीन नियम अधिक कठोर बनवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी हे समजावून घेऊन पुढील काम करावे.
1 thought on “Driving License RULES 2024 : ड्रायव्हिग लायसन्स, वाहतुकीसाठी अद्यापासून नवीन नियम… पहा कशासाठी किती होणार दंड”