आयकर विभागाचा अलर्ट ; आधार-पॅन लिंक नसल्यास करदात्यांना भरावा लागणार दंड

आयकर विभागाचा अलर्ट ; आधार-पॅन लिंक नसल्यास करदात्यांना भरावा लागणार दंड
INCOME TAX – ADHARPAN LINK – आयकर विभागाने करदात्यांना सूचित केलेले आहे कि, 31 मे रोजी पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. तसे ना केल्यास दंड भरावा लागू शकतो . त्यामुळे करदात्यांकडे फक्त दोन दिवसाचं शिल्लक आहेत.
आयकर विभागाच्या नियमांनुसार, जर पॅन कार्ड बायोमेट्रिक आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर लागू असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने टीडीएस कापला जाणार आहे. 31 मे २०२४ पर्यंत पॅन आणि आधार लिंक केले तर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा दंड भरावा लागणार नाही. याबाबत मागील महिन्यातच आयकर विभागाने एक निवेदन जरी केले होते. तसेच आयकर विभागाने दि. २८ मे रोजी ‘एक्स’ म्हणजेच ट्विटर पोस्टमध्ये याबाबत म्हटले आहे कि, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न केल्यास अधिकच टॅक्स भरावा लागणार आहे.
हेही वाचा : “माधुरी दीक्षित”चं सौंदर्य आजही घायाळ करणार; जाणून घेवूया फिटनेस मंत्रा
बँका आणि व्यापारी यांनाही सूचना
आयकर विभागाने एका स्वतंत्र पोस्टमध्ये बँका, परदेशी चलनाचे व्यापारी, उपरजिस्ट्रार, एनबीएफसी, पोस्ट कार्यालय, बॉन्ड किंवा ऋणपत्र जारीकर्ता, म्युच्युअल फंड ट्रस्टी, लाभांश देणाऱ्या किंवा शेअर पुन्हा खरेदी करणाऱ्या कंपन्यांच्या कर अधिकाऱ्यांनी स्वतः दंडापासून बचावासाठी 31 मे पर्यंत एसएफटी दाखल करणे भाग आहे. एसएफटी दाखल करण्यासाठी 31 मे 2024 ही अखेरची तारीख असेल. वेळेवर तपशील दाखल केल्यास दंडापासून बचाव करता येईल.
मुदतीनंतर प्रत्येक दिवसासाठी १००० दंड
एसएफटी रिटर्न दाखल करण्यास उशीर झाला तर मुदतीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 1000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. एसएफटी दाखल न केल्यास किंवा त्यातली माहिती चुकीची दाखल केल्यास दंड भरावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीकडून दिल्या गेलेल्या अतिरिक्त रकमेच्या देवाणघेवाणीवर आयकर विभाग एसएफटीच्या माध्यमातून लक्ष ठेवत असतो. त्यामुळे या शिल्लक दोन दिवसामध्ये करदात्यांना हे करणे भाग आहे. आणि तेही काळजीने करावे लागणार आहे. अन्यथा अतिरिक्त दंड भरावा लागणार आहे.
1 thought on “आयकर विभागाचा अलर्ट ; आधार-पॅन लिंक नसल्यास करदात्यांना भरावा लागणार दंड”