देशात एनडीए हे २९१ तर इंडिया आघाडी हि २३६ जागांवर आघाडीवर

देशात एनडीए हे २९१ तर इंडिया आघाडी हि २३६ जागांवर आघाडीवर
Loksabha result 2024 – देशात लोकसभेचे निकाल जाहीर होताना दिसत असून गुजरातमधून भाजपचे नेते अमित शहा यांनी विजय मिळवला आहे. तर कर्नाटकमधीन हासन लोकसभा मतदार संघातील जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवण्णाचा पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाचे श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. देशात एनडीए हे २९१ तर इंडिया आघाडी हि २३६ जागांवर आघाडीवर आहे. निकाल पुढे मागे होत आहेत.
तर महाराष्ट्रात मात्र महायुतीचे १९ तर महाविकास आघाडी हि २८ जागांवर आघाडीवर आहे. अहमदनगर मधून राष्ट्रवादीचे निलेश लंके हे १० हजार मतांनी आघाडीवर आहेत तर डॉ. सुजय विखे हे पिछाडीवर आहेत. तर बीडमध्ये राष्टवादी (sp) पक्षाचे बजरंग सोनावणे हे आघाडीवर आहेत तर भाजपच्या पंकजा मुडे या पिछाडीवर आहेत. जालना मतदार संघात भाजपचे रावसाहेब दवणे हे पिछाडीवर तर काँग्रेसचे कल्याण काळे हे आघाडीवर आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात चौदाव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील ६० हजार ७७४ मतांनी आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये ठाकरे गराचे अनिल देशाची हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. रायगड येथे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे मोठ्या मताधिक्याने आघाडी घेतली असुन शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते हे पिछाडीवर आहेत. तर शिरूर मतदार संघात अमोल कोल्हे हे आघाडीवर असुन शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत. छत्रपती संभाजी नगर येथे मात्र शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे आघाडीवर आहेत,
पुणे मतदार संघात भाजपचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असून किँग्रेसचे आ. रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत. चंद्रपूर येथे मात्र भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे विजयी होतील अशी अपेक्षा वाटत होती मात्र त्यांना काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर या लोखोंच्या मठाधिक्याने आघाडीवर आहेत. तर त्यांचा विजय हा निश्चित आहे. तर सातारा या मतदार संघात छत्रपती उदयनराजे भोसले हे आघाडीवर आहेत, सुरुवातीला ते पिछाडीवर होते. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी (sp) चे उमेदवार शशिकांत शिंदे हे पिछाडीवर आहेत. सोलापूर येथे देखील काँग्रेस च्या प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत तर, भाजपचे रॅम शिंदे हे पिछाडीवर आहेत.
महाराष्ट्रात भाजपने आपले खाते उघडले असून मुंबईमधून पीयूष गोयल हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव गोयल यांनी केला आहे. धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्या पेक्षा १ लाख पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापूर मतदार संघातून छत्रपती शाहू महाराज हे आघाडीवर असून त्यांचा विजय हा निधीत मानला जात आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंडलिक त्यांच्च्यांपेक्षा आघाडी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे.
बारामती मतदार संघातील खा. सुप्रिया सुळे या आघाडीवर असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत, येथे सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
गुजरातमसभे भाजपाला आताच्या घडीला २ जागांचे नुकसान होत आहे तर, भाजपने दिल्लीत आघाडीवर आहे,तर गोव्यात देखील आघाडी घेतली आहे.मात्र बिहार आणि पश्चिम बंगाल उत्तरप्रदेश महाराष्ट्र, पंजाब येथे भाजपचे गणित बिघडताना दिसत आहे. येथील जागा मागील वर्षीपेक्षा कमी होताना दिसत आहे.