नारायण राणे यांचा विजय, राऊत पराभूत!

नारायण राणे यांचा विजय, राऊत पराभूत!
Naranyan Rane – राज्यात भाजपाला म्हणावे असे यश मिळाले नाही मात्र शिवसेनेचा गड किंवा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी हा विजय नेते,आपला परिवार आणि कार्यकर्ते व जनतेला समर्पित केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार नारायण राणे यांना ४ लाख ५५ हजार २४ मते मिळाली आहेत. तर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना ३ लाख ३ हजार ८३४ मते मिळाली आहेत. शिवसेनेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अस्तित्वाची लढाई होती. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात होते तर भाजपने ऐनवेळी एकनाथ शिंदे गटाकडून हा मतदारसंघ हिसकवण्यात यशस्वीता मिळवली. त्यामुळे उशीराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान कधीकाळी महाराष्ट्र शिवसेनेकडून मुख्यमंत्री असलेले राणे विरुद्ध ठाकरे गटाचे राऊत यांनी ही निवडणूक गाजवली. सिंधुदुर्ग हा राणेंचा गड आहे तर रत्नागिरी विनायक राऊतांचा गड आहे. त्यामुळे राणे रत्नागिरीमध्ये ठाण मांडून बसले होते. राणे यांनी या विजयानंतर विजयोत्सव साजरा केला आहे. तर जनतेचे आभार मानले आहेत.