शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी; लोखंडे यांचा पराभव

शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी; लोखंडे यांचा पराभव
अहमदनगर (प्रतिनिधी) – शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे. येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. लोखंडे हे देखील विखे याच्यावर अवलंबून होते. मात्र जनतेने भाऊसाहेब वाकचौरे याना आपले खासदार म्हणून निवडून दिले असून शिवसेना पक्षप्रमुख (ubt ) उद्धव ठाकरे याच्यावर विश्वास ठेवून याना विजयी केले आहे.
दरम्यान सर्व फेरीचे मतदान घोषित झाल्यानंतर शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय कुमार बिष्ट हे उपस्थित होते.
भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लेखाने यांच्यात चुरशीची लढत झालेली पाहायला मिळाली.