निलेश लंके ठरले जायंट किलर; विखे यांचा पराभव ! राजकीय गणित बदलणार

1
Nilesh Lanke

निलेश लंके ठरले जायंट किलर; विखे यांचा पराभव ! राजकीय गणित बदलणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभूत करून मोठा विजय मिळवला आहे.‌ लंके यांनी सुमारे २९,३१७ मतांनी विजयी आपला विजय संपादन केला आहे. ते जायंट किलर ठरले आहेत. त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदार संघातील विखे यांचे वर्चस्व कमी होणार आहे. तर या विजयामुळे राजकीय गणित भविष्यात बदलणार आहेत.

सकाळी सुमारे ८ वाजेच्या दरम्यान मतमोजणीसाठी सुरुवात झाली, पोस्टल मतमोजणीपासून डॉ. सुजय विखे पाटील हे आघाडीवर होते मात्र सुमारे ८ ते ९ फेरीनंतर ते पिछाडीवर गेले, तर निलेश लंके हे आघाडीवर आले. त्यांनी त्यानंतर थोड्याफार फरकाने आपली आघाडी हि कायम ठेवली. मात्र १६ ते १७ व्या फेरीनंतर त्यांना मताधिक्य मिळत केल्याने त्यांचे लीड वाढले, अधिक फरक पडत असून पराभा निश्चित असल्याचे लक्षात येताच डॉ, सुजय विखे पाटील यांनी मत मोजणीच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृतरीत्या निकाल घोषित करण्यात आला. आणि निलेश लंके याना घोषीत करण्यात आले.

निलेश लंके यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल गुलाल उधळत, फटाके वाजवत मोठा विजयोत्सव साजरा केला. यासाठी कार्यकर्त्यांकडून अगोदरच नियोजन करण्यात आले होते. यंदा तुतारी जोरात वाजणार असा अंदाज लावण्यात आला होता आणि तो खरा ठरला आहे.

दरम्यान सुरुवातीपासून लंके यांना कर्जत-जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघातून चांगली मते तर विखे यांना नगर शहर, राहुरी आणि श्रीगोदयातून मोठी साथ मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान काहीसे याप्रमाणे फेरीप्रमाणे आकडेवारी —
शेवगाव
विखे 24462
लंके 25063

राहुरी
विखे 32904
लंके 26745

पारनेर

विखे 19007
लंके 28008

नगर शहर
विखे 36938
लंके 18499

श्रीगोंदा

विखे 22113
लंके 25592

कर्जत जामखेड
विखे 22241
लंके 24129

विखेंला एकूण
157665 मते

लंकेंना एकूण मते
148036

सहाव्या फेरी अखेर सुजय विखे यांना 9662 मतांची आघाडी आहे

पंधरावी फेरी
डॉ. सुजय विखे 373814
निलेश लंके – 388592
निलेश लंके 14778 मतांनी आघाडीवर

चौदावी फेरी
डॉ. सुजय विखे 348527
निलेश लंके – 360848
निलेश लंके 12321 मतांनी आघाडीवर

तेरावी फेरी
डॉ. सुजय विखे 324452
निलेश लंके – 335171
निलेश लंके 10719 मतांनी आघाडीवर

बारावी फेरी
डॉ. सुजय विखे 301002
निलेश लंके – 311606
निलेश लंके 10604 मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी
डॉ. सुजय विखे 275370
निलेश लंके – 286907
निलेश लंके 11537 मतांनी आघाडीवर

नववी फेरी
डॉ. सुजय विखे 225886
निलेश लंके – 234112
निलेश लंके 8226 मतांनी आघाडीवर

आठवी फेरी
डॉ. सुजय विखे 202679
निलेश लंके – 207558
निलेश लंके 4879 मतांनी आघाडीवर

सातवी फेरी
डॉ. सुजय विखे 177796
निलेश लंके – 181835
निलेश लंके 4039 मतांनी आघाडीवर

अपक्ष आळेकर याना ७ हजारांहून अधिक मते

लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे गोररक्ष दशरथ आळेकर यांनी ७ हजार १४० मते मिळवली आहेत. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या बसपाचे उमेदवार उमाशंकर यादव याना अवघी ७५८, तर वंचितचे दिलीप खेडकर यांना २ हजार ३३ मते मिळाली आहेत ही आकडेवारी ४ थ्या फेरी अखेर आहे.

सहावी फेरी
डॉ. सुजय विखे 157635
निलेश लंके – 148036
डॉ. सुजय विखे 8599 मतांनी आघाडीवर

पाचवी फेरी
डॉ. सुजय विखे 131211
निलेश लंके – 121348
डॉ. सुजय विखे 9863 मतांनी आघाडीवर

पहिला राऊंड –

सुजय विखे पाटील – 27466
निलेश लंके – 24637
सुजय विखे 2829 मतांनी आघाडीवर

लंकेकडून स्व. राठोड यांची आठवण
निकालानंतर माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांनी महाविद्यालय आघाडीच्या नेत्याचे आभार मानले. तसेच त्यांनी स्व.‌अनिल राठोड यांची आवर्जून आठवण काढली. आज माझ्या पेक्षाही जास्ती आनंद अनिल राठोड यांना झाला असता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

जनतेचा विजय : लंके
जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे कोणाबद्दलही काहीही बोलायचे नाही, आरोप करणार्यांना, दादागिरी करणार्यांना लखलाभ लाभो, हा विजय सर्व पसक्षीयांचा, या जनतेचा आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर लंके यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित दिली.

लोणीचा पाहून लोणीला पाठवला : राणीताई लंके
निलेश लंके यांनी आघाडी घेतल्यानंतर नगर जिल्यासह सर्वत्र विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्याचप्रकारे राणीताई लंके यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसोबत विजय साजरा केला, त्यावेळी त्या म्हणाल्या कि, साहेब दिल्लीला जाणार आहेत, खूपच आनंद होत आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच विखे हे लोणीचे पाहुणे होते त्यांना लोणीलाच पाठवले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मतमोजणीवेळी लाठीचार्ज
दुपारी ४ वाजेच्या दरम्यान निकाल जाहीर होत असताना डॉ. सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही गटाकडून बाचाबाची झाल्याचे समजतेय. यामध्ये एका कार्यकर्त्याची गाडी फोडण्यात अली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर गर्दी नियंत्रणात येऊन पुढील अनर्थ टाळला.

About The Author

1 thought on “निलेश लंके ठरले जायंट किलर; विखे यांचा पराभव ! राजकीय गणित बदलणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.