नवनिर्वाचित खासदर सोनावणे – जरांगे यांची भेट; गाडीला अपघात

नवनिर्वाचित खासदर सोनावणे - जरांगे यांची भेट; गाडीला अपघात
bajrang sonavane –बीड लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी मराठा संघर्षयोद्धा, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर रात्री 2:30 वाजता भेट घेतली. आणि विजयाचा आनंद व्यक्त करत आंदोलनावर चर्चा झाली असल्याचे खा. बजरंग सोनावणे यांनी सांगितले. पहाटे भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या ताफ्यातील एक गाडीला अपघात झाला. मात्र त्यात कोणीही सुदैवाने जखमी झाले नाही.
दरम्यान दि. 8 जून पासून मनोज जरंगे पाटील हे उपोषण सुरु करणार आहेत. त्यांच्यासोबत कायम ताकदीने उभे राहणार असल्याची सोनावणे यांनी म्हटले असून आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी अशी विनंती जरंगे पाटील याना केली असल्याचे सांगितले आहे. तसेच न्यायहक्काच्या लढाईत सोबत असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य व शुभेच्छा घेऊन परतल्याचे समाधान वाटले. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान सोलापूर – धुळे महामार्ग शहागड येथे काही मुस्लिम बांधव बजरंग सोनवणे यांचा सत्कार करण्यासाठी थांबले होते. हा सत्कार स्वीकारण्यासाठी बजरंग सोनवणे यांची गाडी शहागड पुलावर थांबली. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या ताफ्यात फॉर्च्यूनर आणि स्विफ्ट गाडी होती. बजरंग सोनवणे यांच्या गाडीने ब्रेक लावल्यानंतर त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या फॉर्च्यूनरने ही ब्रेक मारला. या फॉर्च्युनर मागे चालत असलेल्या स्विफ्ट कारनेही ब्रेक मारला. परंतु ब्रेक मारताना स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि या कारने बजरंग सोनवणे यांच्या गाडीच्या पाठीमागे चालणाऱ्या फॉर्च्युनर गाडीला धडक दिली. अपघातात स्विफ्ट कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र बजरंग सोनवणे यांच्या गाडीला आणि बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळ्जीव्यक्त केली होती.
मराठा आंदोलनाचा फायदा बजरंग सोनावणे याना झाला असल्याने त्यांनी जरंगे पाटील यांची भेट घेतली होती.
1 thought on “नवनिर्वाचित खासदर सोनावणे – जरांगे यांची भेट; गाडीला अपघात”