Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार? पक्षश्रेठींकडे विनंती करणार !

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; गुजरातला टाकले मागे : फडणवीस
Devendra Fadanvis – आता मला विधानसभेसाठी पूर्ण तयारी करायची आहे. मला सरकारमधून मोकळं करावे, म्हणजेच आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावं, अशी विनंती मी पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपसह राज्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामा देऊ नये असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पराभव हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण एक टीम आहोत असे म्हटले आहे.
दरम्यान राज्यात भाजपाला जागा कमी जरी मिळाल्या आहेत, मात्र आम्हाला आणि आघाडीला समसमान मते मिळाली आहेत. काही ठिकाणी अँटीइंकबसी दिसून आली, काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. तर सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटीव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.