… पराभव स्विकारत डॉ. विखे यांचा मतदारांना जनसेवेचा विश्वास !

... पराभव स्विकारत डॉ. विखे यांचा मतदारांना जनसेवेचा विश्वास !
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील याचा निलेश लंके यांनी पराभव केला त्यानंतर दुसऱ्यादिवशी दि. ५ जून रोजी डॉ. विखे यांनी सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे जिल्ह्यातील मतदारांचे आभार मनात ते म्हणाले कि, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात आपण सर्वांनी बहुमूल्य योगदान देऊन माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदान केले.
दरम्यान या जनाधारात थोड्याफार फरकाने पराभव जरी पत्करला असेल तरीही मी आपणास आश्वासन देतो की, ज्या तत्परतेने मागील पाच वर्ष जनहिताची कामे केली, त्याच जोशाने येथून पुढेही आपल्या सेवेत राहणे पसंत करेल. निवडणुका येतात आणि जातात, कधीतरी पराजयाचा देखील सामना करावा लागतो.
परंतु अखेरीस या गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी नेहमी योगदान देत राहणे हे खऱ्या लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते आणि येणाऱ्या काळात मी ते पुरेपूर पार पाडेन. आपण मला जी साथ दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार.
तसेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे समस्त नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !
दरम्यान निलेश लंके हे सुमारे २९ हजार मतांनी विजयी झाले होते.