पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Dhananjay Munde – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड येथे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (sp) पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी ७००० हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी काळ प्रभाव स्विकारत आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया सोशिअल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणाले कि…
राज्यात महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार.
बीड मध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ.
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू!
पंकजाताईच्या या लढाईत 6 लाख 77 हजार पेक्षा अधिक मतदानरुपी आशीर्वाद दिलेल्या माय बाप जनतेचे तसेच अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्यवर नेत्यांचे तसेच सर्व जिवलग सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार…!
ईलAdd
एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते.
उष:काल होता होता, काळरात्र झाली;
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली!
विजयी उमेदवारांचे अभिनंदन!