GOLD RATE : सोने महागले… पहा २४ कॅरेटला किती दर… !

GOLD RATE : सोने महागले… पहा २४ कॅरेटला किती दर… !
Gold rate : देशात सोन्याच्या दरामध्ये रोजच चढउतार पाहायला मिळत आहे. सोन्याची किंमत हि त्याच्या शुद्धतेनुसार (कॅरेट) वेगळी असते. आज दि. ६ जून रोजी पुन्हा एकदा सोन्याचे भाव काहीसे वाढलेले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच भारतीय बाजारातही सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 770, तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे.
या वर्षी सोन्याचे दर 14 टक्क्यांनी तर चांदीच्या दरात 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान जानेवारीमध्ये सोने 2 टक्क्यांनी तर चांदी 4 टक्क्यांनी घसरली होती. तर, फेब्रुवारीमध्ये एक टक्क्यांपर्यंत सोनं मजबूत झाले होते. मात्र, मार्चमध्ये सोन्याचा दर 9 टक्क्यांनी वाढला होता तर चांदीत 6 टक्कांपर्यंत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सारखे चढउतार हे होताना दिसत आहे. मधल्या काळात सोने हे ७६ हजाराच्या पार गेले होते.
सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 6,730 रुपये प्रति ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7,३४२, तसेच 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 67,300 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅमचा भाव 73,420 रुपये इतका आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हेच दर आहेत, मात्र काही शहरांत काहीसा फरक असू शकतो.