Ramoji Rao Death : रामोजी फिल्म सिटीचे “रामोजी राव” याचे निधन

रामोजी फिल्म सिटीचे "रामोजी राव" याचे निधन
ramoji rao – हैदराबादच्या रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजता निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पार्थिव रामोजी फिल्मसिटीतील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. जेथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
रामोजी राव यांचे नाव चेरुकुरी रामोजी राव होते. 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रामोजी राव यांनी व्यवसाय आणि चित्रपटांच्या जगात खूप नाव कमावले. त्यांनी रामोजी ग्रुपची स्थापना केली, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगु वृत्तपत्र यांचा समावेश आहे.
दरम्यान राव यांची संपत्ती 4.7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. तात्यांचे उषाकिरण मुव्हीज नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. त्याच्या बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू चित्रपट दिले. आहेत. तसेच त्यांच्या रामोजी फिल्म सिटी येथे अनेक चित्रपटांच्या देखील शूटिंग होत असतात. त्यांच्या निधनानंतर अनेक नेते, कलाकार, उद्योजक अडकिनी शोक व्यक्त केला.