UPI Lite : RBI च्या निर्णयानंतर UPI लिट मध्ये बदल; ग्राहकांना वापर होईल सोपा

UPI Lite : RBI च्या निर्णयानंतर UPI लिट मध्ये बदल; ग्राहकांना वापर होईल सोपा
UPI LITE – रिझर्व्ह बँकेने UPI Lite मध्ये बदल केले असून, आता UPI Lite साठी वारंवार पैसा जमा करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे याचा फायदा हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार आहे. सुरक्षितता, विश्वास आणि सुपरफास्ट या त्रिसूत्रीवर युपीआय लाईटचा वापर वाढेल. या बदलाचा ग्राहकांना फायदाच होणार आहे. यामध्ये यूजर ५०० रुयांपेक्षा कमी व्यवहार करू शकतो.
दरम्यान युपीआय लाईटमधील पैसे कमी झाले तर ते आपोआप जमा होतील. अर्थात त्यापूर्वी तुमची परवानगी घेण्यात येईल. आरबीआयच्या या बदलामुळे वारंवार पैसा जमा करण्याचा त्रास कमी होणार आहे. बॅलन्स रक्कम कमी झाली की, लाईटमध्ये डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसा जमा करता येणार आहे. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असणार आहे.
याबाबत बैठक घेण्यात आली. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय लाईटचा वाढता वापर पाहुन यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. ई-मेंडेट फ्रेमवर्कअंतर्गत यामध्ये बदल होणार आहेत, एका निश्चित रक्कमेपेक्षा वॅलेटमधील पैसा कमी झाला तर अलर्ट येईल आणि रक्कम वॅलेटमध्ये जमा होईल. हि सेवा युजरला सुरु करावी लागणार आहे.