मोदींचा शपथविधी तयारी पूर्ण; NDA च्या या नेत्यांना मिळणार मंत्रिपद ! राणे, कराड याना वगळले

NARENDRA MODI : मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी; संसदेत संविधानाला वंदन ! NDA ची बैठक संपन्न
PM MODI – देशात लोकसभा निवडणुची NDA ला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज दि. ९ जून रोजी संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज सुमारे ४२ ते ४६ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून देशातील अनेक नेत्यांना यासाठी फोन गेले असून दिल्लीला बोलावणे आले आहे.
महाराष्ट्रातील पाच जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन आला आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, जेष्ठ नेते खा. नितीन गडकरी आणि पियूष गोयल, रक्षा खडसे यांची महाराष्ट्रातून मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. तर भाजपचे नारायण राणे आणि भागवत कराड याना वगळण्यात आले आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे. कारण यासाठी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी NDA मध्ये सामील असलेल्या घटक पक्षाच्या प्रमुखांच्या सल्यानुसार त्यांच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. भाजप मंत्रिमंडळातील महत्वाची खाती हि आपल्याकडेच ठेवणार आहे.
यांची केंद्रांत मंत्रीपदी लागणार वर्णी ?
१. जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंदी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३१. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
३२. निर्मला सीतारमन,भारतीय जनता पार्टी
३३. अन्नपूर्णा देवी,भारतीय जनता पार्टी
३४. सीआर पाटिल, भारतीय जनता पार्टी
३५. अजय टम्टा, भारतीय जनता पार्टी
३६. एस. जयशंकर, भारतीय जनता पार्टी
३७. जे. पी. नड्डा, भारतीय जनता पार्टी
३८. शिवराज सिंह चौहान, भारतीय जनता पार्टी
३९. पंकज चौधरी, भारतीय जनता पार्टी
४०. कमलेश पासवान, भारतीय जनता पार्टी
४१. सुधीर गुप्ता, भारतीय जनता पार्टी
४३. हरदीप सिंग पुरी, भारतीय जनता पार्टी
४४. सरबानंद सोनोवाल, भारतीय जनता पार्टी
४५. भुपेंद्र यादव,भारतीय जनता पार्टी
४६. प्रल्हाद जोशी, भारतीय जनता पार्टी